आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gadkari: Bowing To Modi, I Compromised On Snajay Joshi Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी मोठे नेते असल्यामुळे जोशी प्रकरणात पक्षाची माघार - गडकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच हे मान्य केले आहे की, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे एक मोठे नेते असल्यामुळे संजय जोशी प्रकरणात पक्षाने माघार घेतली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत गडकरींनी सांगितले की, मोदी एक मोठे नेते आहेत. त्यामुळे मला संजय जोशी प्रकरणात माघार घ्यावी लागली.
संजय जोशी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून हटविले नाही, तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि परिषदेचा राजीनामा देण्याचा इशारा मोदी यांनी दिला होता. त्यानंतर नरेंद्र मोदीचे वलय पाहता गडकरी यांनी एक पाऊल मागे येत आपल्या जवळच्या मित्राला राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर संजय जोशी यांनी राजीनामा दिला होता.
गडकरी यापूर्वी म्हणाले होते की, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. संजय जोशी यांनी स्वतःच्या मर्जीने राजीनामा दिला होता. आता मात्र गडकरींनी हे मान्य केले आहे.
गडकरी यांनी संजय जोशींना युपीचे प्रभारीपदी दिले होते. त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मोदींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचारास नकार दिला होता. अखेर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतरच मोदी भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीस उपस्थित राहिले होते.
आणखी काय म्हणाले गडकरी
- अण्णा हजारेंना आमचे समर्थन नको असेल, तर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाहीत.
- जर टीम अण्णा भाजप पासून दूर राहण्यास इच्छुक असेल, तर ती त्यांची पसंत आहे.
- माझे वयक्तिक मत असे आहे की, अण्णा राजकीय नेते नाहीत. ते एक सामजिक कार्यकर्ते आहेत.
- संजय जोशी प्रकरणात मी माघार घेतली, कारण मोदी एक मोठे नेते आहेत.
- संजय जोशी नागपूरमध्ये कोणत्याही निवडणुकीचे काम पाहणार नाहीत
- माझे आणि नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत.