आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींनी माफी मागावी : प्राप्तिकर अधिकारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

-
नवी दिल्ली - पूर्ती प्रकरणातील वक्तव्याबद्दल माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी माफी मागावी, अशी मागणी प्राप्तिकर अधिका-यांनी केली. गडकरींचे वक्तव्य ही थेट धमकी होती. यामुळे सरकारने या अधिका-यांना सुरक्षा पुरवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय महसूल सेवा संघटनेच्या अधिका-यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पारित करण्यात आला.

पूर्ती समूहातील गुंतवणुकीची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होऊ नये म्हणून धमकी दिल्याचे दिसून येत असल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नेत्याने धमकीची भाषा वापरल्याबद्दल या वेळी निषेध नोंदवण्यात आला.