आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींनी गड सोडला; राजनाथ होणार अध्यक्ष, केवळ औपचारिकता बाकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - आश्चर्यकारक नाट्यमय घडामोडींनंतर मंगळवारी रात्री अंदाजे सव्वानऊ वाजता नितीन गडकरी यांनी भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता मोठी उलथापालथ झाली नाही तर बुधवारपासून भाजपची धुरा राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर असेल. रा.स्व. संघ आणि भाजपमध्ये राजनाथ यांच्या नावावर सहमती झाली आहे. बुधवारी सकाळी होणा-या संसदीय पक्षाच्या बैठकीत राजनाथ यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले जाईल. दुपारपर्यंत राष्‍ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल.

तत्पूर्वी, गडकरी यांना दुसरी टर्म देण्याचा निर्णय झाला होता. परंतु मंगळवारी वेगाने घडामोडी घडल्या आणि सगळे चित्रच पालटून गेले. आयकर खात्याने पूर्ती ग्रूपच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. अडवाणीदेखील मुंबईतच होते. संघाचे नेते भैयाजी जोशी यांची त्यांनी तत्काळ भेट घेतली. गडकरीदेखील सोबत होते. प्रदीर्घ चर्चा झाली आणि निरोपाचा निर्णयही झाला.
गडकरी यांचे अपयश व यश
कर्नाटकात पक्षात दुफळी. येड्डींचा रामराम
झारखंडमध्येही भाजप आघाडी सरकार गेले हिमाचल, उत्तराखंडात भाजप सरकारांचा पराभव
*कल्याणसिंह, उमा भारती यांना पक्षात आणले
* पंजाबमध्ये अकाली दल नेतृत्वाखाली भाजप सरकार कायम राहिले
राजनाथ यांची बलस्थाने, अपयश
*संघ, अडवाणी, मोदी गटादरम्यान राजनाथ तडजोडीचे उमेदवार
* मायावतींशी चांगले संबंध, रालोआ बळकटीत मोलाची भूमिका ठरेल
* मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत राजनाथ यांच्या नेतृत्वाखालीच भाजप-रालोआचा पराभव झाला होता.
दिवसभरातील घडामोडी
* सकाळी गडकरींच्या ‘पूर्ती’शी संबंधित मुंबई-पुण्यातील 9 प्रतिष्ठानांवर आयकर धाडी.
*. गडकरींनी सायं. 4 वा. पत्रक काढले. दुस-या टर्मसाठी निवडीच्या पूर्वसंध्येला ही कारवाई आपल्याला बदनाम करण्यासाठीच होत असल्याचे म्हटले. म्हणजेच स्वत:च्या निवडीची घोषणाच.
पक्षातून विरोधानंतर अर्ध्या तासाने सुधारित पत्रक काढले. म्हणाले, हा निवडणुकीआधी बदनाम करण्याचा प्रयत्न. त्यात नावाऐवजी ‘पक्षाध्यक्ष’ शब्द लिहिला.
* पाच वाजता यशवंत सिन्हा म्हणाले, मी निवडणूक लढवणार.
*. वाढत्या विरोधानंतर भाजप नेत्यांची बैठक. मोदींचाही सल्ला घेतला गेला. राजनाथ यांच्या नावावर एकमत.
गडकरीविरोधी कंपूचा विजय
* अडवाणी यांनी गडकरींच्या दुस-या अध्यक्षपदास विरोध केला होता.
* पूर्ति समूहाचे प्रकरण समोर आल्यानंतर कार्यसमिती सदस्य महेश जेठमलानी यांनी 5 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता.
*पुढच्याच दिवशी त्यांनी गडकरींकडून राजीनामा मागितला.
* यशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा यांनीही गडकरींना विरोध दर्शवला.
*गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही गडकरींना विरोध होता.