आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Galasan Village Case In Gujarat : No Entry For Dalit In Temple

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमधील गलसान गावातील प्रकार : दलितांना मंदिरात प्रवेश बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमधील एका गावात दलितांवर मंदिरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गावातील दलित युवकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मंदिर प्रवेशास आधीपासूनच बंदी असून आता त्यांना दूध व इतर वस्तू देण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.


गलसान हे गाव अहमदाबाद जिल्ह्यातील धनधुका तालुक्यात येते. गावात पाचशे दलित राहतात. सुनील परमार या युवकाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी दलितांनी त्यांच्या मंदिर प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीस विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. याचा राग आल्याने ग्रामस्थांनी 5 फेब्रुवारीपासून त्यांना दूध व इतर वस्तू विकण्यास विक्रेत्यांना मनाई केली आहे. दलित नागरिक मंदिर प्रवेशावर अडून बसल्यानंतर सर्वच दलितांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना काही मेंढपाळांकडून दूध खरेदी करावे लागत आहे.


प्रशासनाची भूमिका
दरम्यान, सामाजिक न्याय विभागाचे संचालक एम. ए. नरमावला यांनी अन्य अधिका-यांसोबत गावाचा दौरा करून परिस्थितीचा अंदाज घेतला. तथापि दलितांवरील बहिष्कार किंवा भेदभावावर त्यांनी काही भाष्य केले नाही. मंदिरात दलितांना प्रवेशबंदी असल्याचा त्यांनी इन्कार केला. तथापि दलित मंदिरात प्रवेश करणार असतील तर त्यांना संरक्षण देईल, असे स्पष्ट केले.