आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी \'इन अ‍ॅक्शन\' ;उपाध्यक्ष झाल्यानंतर घेतली प्रथमच पत्रकार परिषद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसचे जयपूर येथे झालेल्या अधिवेशनात उपाध्यक्ष बनलेल्या राहुल गांधी यांनी त्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
राहुल आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी नकारात्मक राजकारण करणार नाही. तसेच देशातील अधिकाधिक युवकांना राजकारणात आणण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी संपूर्ण देशात बदल घडवू इच्छितो. माझा सकारात्मक राजकारणावर विश्वास असून, त्याद्वारे मी नक्कीच देशात बदल केल्याशिवाय राहणार नाही, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत.
राहुल गांधी यांचे सोनिया गांधी यांच्यानंतर काँग्रेस पक्षात आता स्थान आहे. त्यांनी आज सर्व सरचिटणीसांची बैठक घेऊन चर्चा केली. एकून लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली असल्याचे व राहुल गांधी 'इन अ‍ॅक्शन'मध्ये आल्याचे दिसून येते.