आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी दिल्ली असुरक्षित; चीनी युवतीवरील बलात्कार प्रकरणी ड्रॅगन भडकला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली/बीजिंग - दिल्ली मध्ये झालेल्या गँगरेपनंतर महिलांसाठी दिल्ली असुरक्षित असल्याचे सर्वस्तरातून बोलले जात होते. आता चीनी महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर ड्रॅगनही भारतातील महिला सुरक्षिततेबद्दल आग ओकत आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार चीनी दुतावासाने, दिल्लीतील चीनी युवतींनी एकटे फिरायला जाऊ नये आणि सतर्क राहावे असा सल्ला दिला आहे.

बीजींगने दिल्ली सरकारला म्हटेल आहे की, पीडित मुलीची ओळख उघड करु नये. तसेच तिचे संरक्षण आणि उपचाराकडे लक्ष द्यावे. दोषीला लवकरात लवकर शिक्षा करावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करत असल्याचे चीनला कळविले आहे.

३० जानेवारी रोजी एका चीनी युवतीवर बलात्कार झाला होता. मात्र, तिने तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. याआधी १६ डिसेंबर रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार झाला होता. तेव्हा दिल्लीसह देशभरातून त्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला होता.

देशभरातून आक्रोश झाल्यानंतही राजधानीतील बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. गुरुवारी एक गँगरेप आणि इतर तीन बलात्काराच्या घटना समोर आल्या. स्वरुपनगर येथे गँगरेपची घटना घडली तर, शकरपूर येथे घरमालकानेच भाडेकरुवर अतिप्रसंग केला. अमन विहारमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत तर, गोविंदपूरमध्ये सात वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म करण्यात आले. या सर्व प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. महिला अत्याचाराविरोधात कठोर कायदा करण्याकडे सरकार पाऊले टाकत आहे. मात्र, राजधानीसह देशात रोज बलात्काराच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे बलात्कार करणा-या आरोपींना कायद्याचे भय राहीले नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे?