आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करून ज‍िवंत जाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर: खुरई तालुक्यातील खजरा हरचंद गावात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
सकाळी ती प्रातविर्धीला गेली असता गावातील मुकेश, दीपक, मुरली आणि विवेक कुर्मी या नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, असा जबाब पीडित मुलीने दिला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावातील नाग‍रिकांनी तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी तहसीलदार दिनेश शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुरली आणि विवेक अशी त्यांची नावे आहे. त्यांचे साथीदार मुकेश आणि दीपक फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
तीन आरोपी अल्पवयीन:
या प्रकरणातील आरोपी मुकेश (20) सोडून अन्य तीन आरोपी अल्पवयीन आहे. त्यात दीपक (16), मुरलीधर (11) व विवेक (9) यांचा समावेश आहे.

सलग सात वर्ष धमकावत वकिलाने केला बलात्कार
पुरुषावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली महिलांनाही होऊ शकते शिक्षा
मुख्याध्यापकांनीच केला विद्यार्थिनीवर बलात्कार