आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीतिका- कांडा प्रकरणाला नवे वळण; आता गीतिकाच्या आईने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- एअर होस्‍टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गीतिकाच्या आईनेही शुक्रवारी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र गीतिकाच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींने सांगितले की, गीतिकाच्या आईने अशोक विहारमधील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली आहे.

गीतिकाचे मामा आणि गीतिका प्रकरणाबाबतची केस लढत असलेल्या वकीलानेही या घटनेला दुजोरा दिला असून, गीतिकाची आई अनुराधा शर्मा यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. अनुराधा शर्मा यांचे शरीर घरातील सिलिंग फॅनला लोबकळत असल्याचे दिसून आले. तेथे सुसाईड नोट सापडली असून त्यात म्हटले आहे की, गोपाल कांडा आणि अरुणा चड्ढा यांना दोषी ठरले आहे. शर्मा कुटुंबियांनी सांगितले की, गीतिकाच्या मृत्यूनंतर तिची आई त्या धक्क्यातून सावरली नव्हती.