आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geetika Sharma Autopsy Report Geetika Had Sex Two Days Before His Death

पोस्टमार्टम रिपोर्ट: आत्महत्या करण्यापूर्वी झाले होते गीतिकाचे शारीरिक शोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी दिल्ली हाय कोर्टाने फरार आरोपी गोपाल कांडाचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला. कोर्टाने गुरुवारी कांडाविरुद्ध अटक वारंट काढले होते. तसेच कांडाला 24 ऑगस्टपर्यंत कोर्टात हजर करावे, असे आदेशही दिल्ली पोलिसांनी दिले होते.
कांडा विदेशात पसार झाल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. यामुळे पोलिस इंटरपोलची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी, एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गीतिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक तथ्य समोर आल्याने खळबळ माजली आहे. रिपोर्टनुसार आत्महत्याच्या दो-तीन दिवसांपूर्वी गीतिकाचे शारीरिक शोषण झाले होते.
गीतिकाचे शारीरिक शोषण कोणी केले, याचा पो‍लिस तपास करत आहेत. दरम्यान, गीतिकाचा कोणी जवळचा मित्र नसल्याचे तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गीतिकाचा डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच याप्रकरणी सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्ये प्रकरणातील अनेक खुलासे समोर येत आहेत. गीतिकाच्या शवविच्छेदन अहवालामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आरोपी आणि हरियाणाचे गृहमंत्री गोपाल कांडा हा बेशरम व्यक्ती असून त्याची प्रत्येक मुलीवर वाईट नजर असल्याचे गीतिकाने मृत्यूपूर्व लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये सांगितले होते.
मृत गीतिकाचे शवविच्छेदन दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये 6 ऑगस्टला करण्यात आले होते. अहवालानुसार गीतिकाच्या मृत्यूसोबत अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गीतिका सुसाइड केस: आरोपी गोपाल कांडाविरुद्ध काढले पकड वारंट
गीतिकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचे उघड