आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geetika Sharma Suicide Case Criminal Gopal Kanda Searching

गीतिका सुसाइड केस आणि अनुत्तरीत प्रश्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी हरियाणाचे माजी गृहमंत्री गोपाल कांडा अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे कांडांचे वकीलांचे दिल्ली हायकोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामीनसाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. एवढेच नाहीतर गीतिका ही कांडांशी परिचित असलेल्या महिलांवर जळायची, असाही आरोप वकीलांनी केला आहे. गीतिकांच्या आत्महत्या करण्यामागील कारण वेगळेच असल्याचे कांडांच्या वकीलांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
गोपाल कांडा गीतिकावर का होता इतका मेहरबान? हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. गीतिका आणि कांडाच्या कुटुंबियांची तशी फारशी जवळीकही नव्हती. सगळ्यात आधी गोपाल कांडाने 17 वर्षीय गीतिकाला 2006 मध्ये एमडीएलआर एअरलाइन्समध्ये 16 हजार रुपये मासिक पगारावर 'फ्लाइट अटेंडेट' म्हणून नोकरी दिली होती. परंतु, मुळात एमडीएलआर एअरलाइन्स कंपनी ही तेव्हा अस्तिवातच नव्हती. 2007 मध्ये ही कंपनी सुरु झाली. असे असतानाही अल्पवयीन मुलीला नोकरी दिली ती कोणत्या आधारावर? तीसुध्दा कंपनी सुरू होण्यापूर्वीच? विशेष म्हणजे गीतिकाने एका वर्षात नोकरी सोडण्याचा विचार केला तर तिला वाढीव पगार देऊन का थांबविण्यात आले? तेव्हा गीतिकाला दुप्पट पगार का देण्यात आला? घरापासून ऑफिसमध्ये येण्यासाठी गीतिकाला आलिशान गाडी देण्यात आली ती तरी कशासाठी? अशा प्रकारचे अनेक प्रश्ने उत्तराच्या प्रतिक्षेतच आहेत.
गोपाल कांडांचे असे कुठले काम होते की ते गीतिकाच्या शिवाय होऊ शकत नव्हते? जर गीतिकाचे काम इतके उत्कृष्ट होते तर मग 2009 मध्ये तिची हॉटेलमध्ये बदली का करण्‍यात आली? विशेष म्हणजे कांडाने गीतिकावरच हॉटेलची संपूर्ण जबाबदारी सोपवली होती.
गीतिकाने 2010मध्ये कांडाच्या कंपनीला 'रामराम' ठोकून अमीरात एअरलाइन्सची नोकरी का स्विकारली? विशेष म्हणजे गीतिकाला एमडीएलआरने एनओसीही दिला होता. परंतु काही दिवसांत कांडाने अमीरात एअरलाइन्सला पत्र पाठवून गीतिकाचे सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे का कळ‍वले होते, हे कोडे मात्र अजूनही कायम आहे. त्यानंतर मात्र अमीरात एअरलाइन्समधील गीतिकाची नोकरी गेली. गीतिकाचे नोकरी गेल्याचा फायदा घेत कांडाने तिला पुन्हा आपल्या कंपनीत बोलावून घेतले आणि ते ही प्रमोशनवर. जर गीतिकाविरुद्ध कांडाला कारस्थान करायचे होते तर मग तिला पुन्हा आपल्या कंपनीत का नोकरी दिली? ती ही 66 हजार रूपयांच्या तगड्या पगारावर? विशेष म्हणजे कांडाच्या शिफारसीने गीतिकाला कंपनीने बीएमडब्ल्यू कारही देण्यात आली होती.
कांडा याने गीतिकाला अल्पावधीतच एका शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद तर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे उपाध्यक्षपद दिले होते. विशेष म्हणजे कांडा नेहमी गीतिकाला सिंगापूर आणि दुबईला घेऊन जात होता. गीतिकाला दररोज ऑफिसातले काम संपल्यानंतर कांडाला भेटण्यासाठी त्याच्या घरी का जावे लागत होते? कांडा गीतिकाशी दररोज तासंतास बोलत असायचा तरी तो तिला दिवसाला 400 एसएमएस का पाठवायचा? ही सगळी प्रश्न अजूनही गुलदस्तयातच आहेत.

पोस्टमार्टम रिपोर्ट: गीतिकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचे उघड
गीतिका आत्महत्या प्रकरण: अटकपूर्व जामीनसाठी गोपाल कांडा हायकोर्टात
गीतिका प्रकरण : हरयाणाचा माजी मंत्री कांडा फरार