आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geetika Sharma Suicide Case Criminal Gopal Kanda Searching

गीतिका सुसाइड केस: गोपाल कांडाच्या घरावर पोलिसांची पुन्हा धाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोपाल कांडा अद्याप फरार आहे. दिल्ली हायकोर्टाने कांडा विरोधात गुरुवारी अटक वारंट काढले आहे. कांडाला 24 ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर करावे, असे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिले आहे.
सिरसा येथील कांडाच्या घरावर दिल्ली पोलिसांनी पुन्हा छापेमारी करून त्याच्या एका नातेवाईकाला ताब्यात घेतले आहे. कांडाला पकडण्यासाठी पोलिस काही मोबाइल नंबर ट्रॅक करत आहेत. कांडाच्या शोधार्थ आतापर्यंत पोलिसांना जवळपास पन्नास ठिकाणी छापेमारी केली. परंतु, कांडाला जेरबंद करण्‍यात पोलिसांना यश आलेले नाही. याप्रकरणी आतापर्यंत 25 जणांचीही चौकशी पोलिसांनी केली आहे.
कांडाला अटक करण्यात दिल्ली पोलिस कामचुकारपणा करत असल्याचा आरोप गीतिकाचा भाऊ अंकित शर्माने केला आहे. पोलिस मयत गीतिकाकडे संशयाने पाहत आहे. परंतु तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा आरोपी गेल्या दहा दिवसांपासून फरार असल्याचेही अकिंतने म्हटले आहे.
दुसरीकडे कांडावर माहिती संचानालायातर्फे (ईडी) कारवाई होण्याची शक्यता आहे. एमडीएलआर एअरलाइन्सचे मालक असलेल्या कांडाने काही वैमानिकांचा पगार विदेशी चलनात केला होता. कांडाने फेमाचे उल्लंघन केली आहे. यामुळे कांडाच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
पोस्टमार्टम रिपोर्ट: गीतिकासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध झाल्याचे उघड
गोपाल कांडा गीतिकावर का होता इतका मेहरबान?
गीतिका आत्महत्या प्रकरण: अटकपूर्व जामीनसाठी गोपाल कांडा हायकोर्टात