आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - नवे लष्करप्रमुख विक्रमसिंग यांना सैन्य दलांच्या वतीने ‘मोस्ट डेकोरेटेड सोल्जर’ हा किताब दिला असला तरी त्यांच्यावरील आरोपांचीही चर्चा आता सुरू झाली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करप्रमुखांना पहिल्यांदाच असा किताब देण्यात आला आहे. जनरल विक्रमसिंग यांना आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांच्या आधारे सैन्याने त्यांना हा किताब
दिला आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार जनरल विक्रमसिंग यांनी परम विशिष्ट सेवापदक, उत्तम युद्ध सेवापदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेवापदक, विशिष्ट सेवापदक आणि एडीसी अशी पदके मिळवली आहेत. याच वर्षी 26 जानेवारीला त्यांना परम विशिष्ट सेवा पदक मिळाले आहे. त्यांच्याबरोबर 19 लेफ्टनंट जनरलनाही हा सन्मान प्रदान करण्यात आला. यातील तीन वगळता बाकी सर्व जण सेवेत कार्यरत होते.
सैन्याच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमारसिंह यांचेही नाव या यादीत आहे.
युद्धादरम्यान दाखवलेल्या कौशल्यासाठी जनरल विक्रमसिंग यांना उत्तम युद्ध सेवा पदक मिळाले आहे. सैन्यात अशी अनेक उदाहरणे आहेत.
जाणकारांच्या मते विशेष बाब म्हणजे जनरल विक्रमसिंग यांनी इतकी पदके मिळवली असली तरी कांगो येथील शांती मोहिमेत बटालियनचा शिस्तभंग आणि अनंतनाग येथील बनावट चकमकीचेही आरोप आहेत. त्यामुळे त्यांना सैन्याने ‘मोस्ट डेकोरेटेड सोल्जर’ म्हटल्यामुळे इतर अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे.
नव्या आणि माजी लष्करप्रमुखांचे वादांशी नाते
माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या कारकीर्दीत अनेक वादविवाद उभे राहिले; पण नवे लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतच अनेक वाद उद्भवले आहेत. दोघांच्याही प्रमुख वादांवर एक नजर.
जनरल विक्रमसिग
> 2008 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक आॅफ कांगोमध्ये संयुक्त राष्ट्र शांती मिशनचे नेतृत्व करताना बटालियनच्या सैनिकांवर लूटमार आणि लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप. संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेल्या चौकशीत सत्य निष्पन्न झाले.
> कांगो मोहिमेतील डाग मंत्रिमंडळ नियुक्ती समितीपासून लपवण्यात आल्याचा आरोप. सर्वोच्च् न्यायालयात त्याबाबत पुनर्विचार याचिका दाखल.
> 2001 मध्ये जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बनावट चकमकीचा आरोप. विक्रमसिंग तेव्हा ब्रिगेडियर होते. जम्मू-काश्मीर उच्च् न्यायालयात प्रकरण प्रलंबित.
> त्यांची सून पाकिस्तानी असल्याचा आणि गुप्तपणे क्लीअरन्सचा मुद्दा.
जनरल व्ही. के. सिंह
> वयाचा वाद, लष्करप्रमुख झाल्यानंतर प्रकरण वाढवल्याचा आरोप.
> लाच प्रकरण, माजी लेफ्टनंट जनरल तेजिंदरसिंह यांच्यावर 14 कोटी रुपयांच्या लाचेचा आरोप, सीबीआय चौकशी सुरू.
> दर्जाहीन आणि महागडे टेट्रा ट्रकचा पुरवठा दलालाच्या माध्यमातून होण्याचा मुद्दा पुढे आणला, सीबीआय चौकशी सुरू.
> तेजिंदरसिंहांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला.
> 5 मार्च रोजी लष्कराने लाचप्रकरणी वादग्रस्त पत्रक जारी केले.
> 2014 मध्ये लष्करप्रमुखपदाचे दावेदार असलेल्या लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्यावर शिस्तभंग व दक्षताप्रकरणी बंदी, त्यांची दावेदारी संकटात.
नवे लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी सूत्रे स्वीकारली
सैन्याचा गौरव जवानांनी जपावा - मेजर जनरल अजय सक्सेना
लढाईसाठी लष्कर तयार : जनरल सिंह
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.