आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girija Devi And Malini Awasthi Erupted On Anoushka Shankar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुष्का शंकरच्या वक्तव्यावर गिरजा देवी, मालिनी अवस्थी भडकल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी- भारताचे प्रख्यात सितारवादक दिवंगत रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकरच्या शारीरिक शोषणाबाबतच्या वक्तव्यावर पद्मभूषण गिरजा देवी आणि त्यांची शिष्या गायिका मालिनी अवस्थी अनुष्कावर चांगल्‍याच भडकल्या आहेत. दिव्यमराठी.कॉम शी बोलताना गिरजा देवी म्हणाल्या, अनुष्का शंकर यांचे हे वक्तव्य प्रत्येक संगीत प्रेमी आणि संगीततज्ज्ञांवर प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे आहे.

ठुमरी सम्राट असलेल्या गिरजा देवीनी अनुष्काने दिलेल्या वक्तव्याचा विरोध करताना म्हटले आहे की, जर अनुष्कासोबत असे काही घडत होते तर तिने आपल्या पित्याकडे तक्रार का केली नाही. आज रविशंकर नसताना अशी वक्तव्ये करणे संयुक्तिक वाटत नाही. तसेच आताच तिला का बोलावे वाटले. यातून तिला काय साध्य करायचे आहे. माध्यमांशी बोलून तिला काय मिळवायचे आहे...