आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुहिक बलात्‍कार करुन युवतीला जिवंत जाळले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊः उत्तर प्रदेशात एका युवतीला सामुहिक बलात्‍कार करुन जाळल्‍याची थरारक घडना उघडकीस आली आहे. फतेहपूर जिल्‍ह्यातील शिवपुरी भागात हा प्रकार घडला आहे. पिडीत मुलीचे गावातल्‍या बाजारातून चार जणांनी अपहरण केले. त्‍यानंतर एका निर्जन जागेवर नेऊन तिच्‍यावर बलात्‍कार केला. हा प्रकार झाल्‍यानंतर मुलीने पोलिसांमध्‍ये तक्रार करण्‍याचा इशारा दिला. त्‍यावरुन चिडलेल्‍या तरुणांनी तिच्‍यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. मुलगी 75 टक्‍के जळाली आहे. तिची प्रकृती अतिशय गंभीर असून तिला शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.