आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl From Jharkhand Files Petition In High Court Against Her Parents

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिलॉर्ड, मम्मी-पप्पा शिकू देत नाहीत...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - झारखंडमधील एका मुलीने आपल्या आई-वडिलांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गतवर्षी 12 वी उत्तीर्ण झालेल्या या मुलीने घरचे लोक पुढे शिकू देत नसल्याचे म्हटले आहे. लग्नासाठी दबाव आणला जात असून, त्यांच्यापासून बचावासाठी तिने पोलिस संरक्षणही मागितले आहे.
या प्रकरणात बुधवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती बिपीन सांघी यांनी दिल्लीत राहणा-या मुलीच्या मोठ्या भावाला समन्स बजावले आहेत. पालकांच्या परवानगीशिवाय मुलगी मे 2011 पासून दिल्लीत कशी काय राहत आहे, अशी विचारणा त्याच्याकडे करण्यात आली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.
तत्पूर्वी, मुलीने झारखंडमधील रामगड जिल्ह्याची रहिवासी असल्याचे सांगितले असून, दिल्लीतील मुखर्जीनगरात पेइंग गेस्ट म्हणून राहत असल्याचे स्पष्ट केले आहे. गतवर्षी मे महिन्यात ती घरातून पळून दिल्लीला आली होती. सध्या ती बँकेच्या परीक्षांची तयारी करत आहे. घरचे लोक तिचे लग्न करून देण्याच्या प्रयत्नात आहेत. दबाव आणण्यासाठी कुटुंबीयांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिस त्रास देत असल्याचेही मुलीने न्यायालयाला सांगितले. तिला पैशांची मदत करणा-या तिच्या भाऊजीवरही अपहरणाचा आरोप करण्यात येत आहे.
मुलीचे वय 19 वर्षे असून, ती सज्ञान आहे. आवडीच्या ठिकाणी राहण्याचा तिला अधिकार आहे, असा युक्तिवाद मुलीचे वकील के.के. मेनन यांनी केला.