आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदिगढमध्‍ये तरुणीवर 2 दिवस सामूहिक बलात्‍कार, एमएमएस बनवून फेकले रस्‍त्‍यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत सामुहिक बलात्‍कारानंतर देशभरात असंतोष उफाळून आल्‍यानंतर सरकार बलात्‍का-यांविरुद्ध कठोर शिक्षेच्‍या गोष्‍टी करत आहे. परंतु, बलात्‍कारी मानसिकता आणि वासनांध वृत्ती निर्दोष महिलांवर अत्‍याचार करीतच आहे. पंजाबमध्‍ये एका तरुणीचे अपहरण करुन सलग दोन दिवस सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आल्‍याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेचा अश्लिल एमएमएसही बनविण्‍यात आला असून तिला बठिंडा येथे एका फेकून देण्‍यात आले. या घटनेने देश पुन्‍हा सुन्‍न झाला आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, पीडित मुलीचे चंदीगढ येथून अपहरण करण्‍यात आले होते. लिफ्ट देण्‍याच्‍या बहाण्‍याने तिचे अपहरण केले. या मुलीने नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले असून परिचारिकेच्‍या पदासाठी ती मुलाखत देण्‍यासाठी चंदीगढच्‍या मुकुट रुग्‍णालयात जात होती. ती सेक्‍टर 43 मधील आंतरराज्‍यीय बस स्‍थानकाबाहेर कारमध्‍ये असलेल्‍या तरुणांनी तिला पत्ता विचारला. कारमध्‍ये एक मुलगीही होती. पीडित मुलीला ज्‍या दिशेने जायचे होते, त्‍याच दिशेने त्‍यांनाही जायचे आहे, असे सांगून तिला लिफ्ट ऑफर केली. तिने ती स्विकारली आणि इथेच तिचा घात झाला. कारमध्‍ये तिला एकाने बेशुद्धीचे इंजेक्‍शन दिले. शुद्धीवर आल्‍यानंतर ती एका बंद खोलीत असल्‍याचे लक्षात आले. त्‍यानंतर तिच्‍यावर त्‍याच अवस्‍थेत दोन दिवस तिच्‍यावर सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आला. त्‍यानंतर तिला बठिंडाजवळ कारमधून फेकून देण्‍यात आले.

पीडितेला काही लोकांनी गंभीर अवस्‍थेत पाहिल्‍यानंतर तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल केले. तिची तपासणी झाल्‍यानंतर बलात्‍कार झाल्‍याचे अहवालात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.