आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेरठ- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे यूपीमधील नगरविकासमंत्री आझम खान यांनी बसपाच्या सुप्रीमो मायावती यांच्याबाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. खान यांनी मायावतींची तुलना शाहजहां यांच्याशी करताना त्यांना लवकरच एखादा औरंगजेब कैद करेल, असे म्हटले आहे.
आखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे व समाजवादी पक्षाचा मुस्लिम चेहरा असलेले आझम खान हे चौधरी चरण सिंह विद्यापीठात कन्या विद्या धन आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना म्हटले की, तुम्ही मायावती बनू नका तर सरोजिनी नायडू बना. उद्या कोण काय बनेल हे सांगता येत नाही. पण मी 'अल्ला'कडे 'दुआ' करेन की, तुम्ही काहीही बना पण मायावती बनू नका.
आझम खान म्हणाले, शाहजहां आणि मायावती यांनी सरकारी संपत्तीचा दुरुपयोग केला. एकाने ताजमहल बांधला तर मायावतीने हत्ती आणि आपले पुतळे उभारले. शाहजहांला जनतेच्या आक्रोशामुळे त्यांचाच मुलगा औरंगजेबने कैद केले होते. असेच बसपाच्या प्रमुख मायावती यांनाही लवकरच एखादा औरंगजेब कैद करेल.
आजम पुढे म्हणतात, मायावती आता यूपीत फिरायला घाबरत आहेत. त्यामुळेच त्या दिल्लीत बसून राजकारण करीत आहेत. यूपीमध्ये कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक कायदा बनण्याची गरज आहे. मुलींचा जन्म व साक्षरता दर वाढविण्याबरोबर त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आमचे सरकार आपल्या बजेटमधील 20 टक्के रक्कम खर्च करीत आहे. पुढील महिन्यात राज्य अर्थसंकल्पात यात आणखी वाढ होईल. तसेच आर्थिक समस्यांमुळे ज्या मुलींना शिक्षण घेणे परडवत नाही, त्यांनाही राज्य सरकार मदत करील, असेही खान यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.