आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीतिका शर्माच्या आईची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - माजी हवाई सुंदरी गीतिका शर्माची आई अनुराधा शर्मा(62) यांनी शुक्रवारी दिल्लीतील अशोक विहार परिसरात आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.गीतिकाने गेलावर्षी ऑगस्टमध्ये आत्महत्या केली होती. तेव्हापासून अनुराधा शर्मा यादेखील मानसिक तणावाखाली होत्या, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.


शुक्रवारी अनुराधा यांनी राहत्या घरी गळफास घेतला. घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनुराधा यांनी मृत्यूपूर्वी पत्र लिहिले असून त्यात हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा व त्यांच्या कुटुंबियांकडून सतत अपमानित करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. गीतिकाच्या मृत्यूनंतर त्यांनीच कांडावर आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती.त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गीतका शर्मा आत्महत्याप्रकरणी गोपाल कांडा व त्यांची सहकारी अरुणा चढ्ढा अनेक दिवसांपासून अटकेत आहेत.