आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- राकेश कुमार : दक्षिण दिल्लीमध्ये स्वत:चे शोरूम. मित्राकडे गेले. रस्त्यातच सिगारेट ओढू लागले. जवळच बाग होती. लहान मुले खेळत होती. राकेशला एका अधिका-याने रंगेहाथ पकडले. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास मनाई असल्याच्या नियमावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. अधिका-याने न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देत स्वत:चा परिचय करुन दिला. राकेशने त्वरित चूक मान्य केली. म्हणाला, कुटुंबीय आणि लहान मुलांसमोर सिगारेट प्यावी वाटत नाही म्हणून कधी कधी बाहेर सिगारेट पितो. कोणत्याही सामाजिक शिक्षेसाठी तो तयार होता. दुस-या दिवशी त्याच अधिका-यासोबत सिगारेट पिणा-यांविरोधातील मोहिमेत सहभागी झाला.
मोहन लाल : शिक्षा- दारू पिऊन आॅटो चालवण्याच्या आरोपाखाली 7 दिवस तुरुंगवास. पुनर्विचार याचिका दाखल केली. कोणतीही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. जेलऐवजी समाजसेवेची शिक्षा देण्याची विनंती केली. कोर्टाने पाच दिवस वाहतूक पोलिसाची मदत करण्याचे आदेश दिले.
अमित : व्यावसायिक. एम.ए.पर्यंत शिक्षण. दारू पिऊन गाडी चालवताना रात्री पकडले गेले. कोर्टात सांगितले, मित्राच्या घरी पार्टी होती. थोडी दारू प्यायली होती पण जेलमध्ये जाण्याची तयारी नाही. पोलिसांसोबत रात्री दारू पिऊन गाडी चालवणा-या चालकांची तपासणी करण्याची शिक्षा मिळाली.
वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते की, न्यायालय, सरकार आणि सक्षम प्रशासनाने निश्चय केल्यास लहान गुन्ह्यांसाठी समाजसेवेसारख्या शिक्षा देऊन जेलमधील कैद्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. तसेच कायद्याचा आदर करण्याची शिकवणही देता येऊ शकते. उशिराने का होईना पण सरकारलाही अशा प्रकरणी मधला मार्ग काढण्याची दृष्टी मिळाली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना आदेश दिले आहेत की , छोट्या गुन्ह्यांसाठी मोठी शिक्षा देण्याऐवजी समाजसेवेची शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जावा. जेणेकरून अशा लोकांचे गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये नाव येणार नाही तसेच जेलमध्ये अट्टल गुन्हेगारांसोबत राहण्याऐवजी समाजातच राहून त्यांना समाजसेवा करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.