आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा विधानसभा निवडणुकीवर महिलांचा 'वॉच'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: पंचायत राजपासून देशातील सर्वोच्च पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या महिलांनी स्वतंत्र भारताच्या निवडणूक प्रक्रियेत यंदा नवा इतिहास घडवला आहे. प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यात 3 मार्चला होत असलेली विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडावी म्हणून निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून महिलांचे पथक नेमले आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करताना आयोगाने गोव्यासाठी 20 निरीक्षकांचे पथक नेमले. यात सर्वच महिला आहेत. एखाद्या राज्यातील निरीक्षकांच्या पथकात सर्वच महिला नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या राज्यासाठी निवडणूक खर्चावर देखरेख करणार्‍या पथकामध्ये पुरुष नेमण्यात आले असले तरी मुख्य प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून एकही पुरुष नेमण्यात आलेला नाही. या पथकात गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी तीन महिला अधिकारी, हरियाणा व छत्तीसगडमधून प्रत्येकी दोन तर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतून प्रत्येकी एक महिला अधिकारी निरीक्षक म्हणून जातील. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अन्य जे अधिकारी नेमण्यात आले आहेत त्यांना पुरेसे काम देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.