आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका दिवसात सोन्याचा भाव हजाराने वधारला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -सोन्याच्या दराने राष्ट्रीय सराफा बाजारात शनिवारी दिवसभरात 1 हजार रुपयांपेक्षा मोठी झेप घेतली. आतापर्यंतचा उच्चांक गाठत सोने प्रतितोळा 30 हजार रुपयांच्याही वर पोहोचले. जागतिक बाजारांतील तेजी, रुपयाच्या अवमूल्यनामुळे सोन्याचे दर झळाळले. चेन्नईत प्रतितोळा 1095 रुपयांनी वधारून 30,380 रुपयांवर पोहोचले. दिल्लीत 960 रुपयांच्या वाढीसह ते 30,300 रुपये झाले. मुंबई आणि कोलकात्यात 895 आणि 785 रुपयांची वाढ झाली. दिवसअखेर मुंबई सोन्याचा दर प्रतितोळा 30,030 रुपये असा होता. न्यूयॉर्क बाजारात सोन्याच्या दरात प्रतिऔंस 66 डॉलर्सची तेजी आल्याने ते 1,626 डॉलर्सवर पोहोचले.
औरंगाबादेत 150 रुपयांची वाढ : औरंगाबादेत सोन्याने शनिवारी तोळ्यामागे 30,550 रुपयांचा उच्चांक गाठला. शुक्रवारी ते 30,400 रुपये होते. राष्ट्रीय बाजारात जुलै 2011मध्ये सोन्याचे दर 22,000 रुपये होते. वर्षभरात त्यात सुमारे 8,5000 रुपयांची वाढ नोंदवली गेली.