आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल आणि फेसबुकच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: गुगल आणि फेसबुक यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. कनिष्ठ न्यायालयाने पाठविलेल्या समन्सच्या विरोधात गुगल आणि फेसबुकने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणी 2 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
देवी देवतांच्या अपमानकारक चित्रांसंबधी न्यायालयाने गुगल इंडियाला समन्स पाठविले होते. परंतु यु ट्यूब, गुगल, ऑर्कुट अथवा ब्लॉगस्पॉटवर प्रसिद्ध होणार्‍या माहितीवर गुगल इंडियाचे कोणतेही नियंत्रण नाही. असे सांगत न्यायालयाने असे समन्स पाठविणे अयोग्य आहे. त्यामुळे न्यायालयाने हे समन्स मागे घ्यावे, अशी याचिका गुगलचे वकील यांनी दाखल केली होती.