आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात चीनसारखी एकाधिकारशाही आहे काय? - गुगल इंडियाचा युक्तीवाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात चीनसारखी एकाधिकारशाही शासनपद्धत नाही. त्यामुळे वेबसाइटवरील मजकूर वगळता येणे अशक्य असल्याचा युक्तिवाद सोमवारी गुगल इंडियाने उच्च न्यायालयात केला. चीनमध्ये प्रत्येक गोष्ट सरकारच्या अधिपत्याखाली असते.
गुगल आणि फेसबुकसह 20 वेबसाइट्सवर उच्च न्यायालयात सध्या गुन्हेगारी खटला चालवला जात आहे. या सर्व वेबसाइट्सवर अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसारित करण्याचा आरोप आहे. न्यायालयात गुगल इंडिया कंपनीचे वकील एन.के. कौल म्हणाले की, हे प्रकरण घटनादत्त अधिकारांबाबतचे आहे. घटनेत देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. खटल्याबाबत गुगल व इतर वेबसाइट्सवर कनिष्ठ न्यायालयाकडून जारी झालेले सर्व समन्स रद्द करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. एखाद्या वेबसाइटवर आक्षेपार्ह मजकूर असल्यास त्याबाबत गुगलसारख्या सर्च इंजिनला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. याची जबाबदारी गुगलवर नाही. इतकेच नव्हे तर गुगल इंडियाची अमेरिकास्थित मूळ कंपनी गुगल इनकॉर्पाेरेशन्सद्वारे झालेल्या कोणत्याही गुन्हेगारी कारवाईबाबत उत्तरदायी ठरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
गेल्या सुनावनीदरम्यान आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची यंत्रणा तयार न केल्यास या वेबसाईटला ब्लॉक केले जाईल असा इशारा उच्च न्यायालयाने दिला होता. हा इशारा देताना उच्च न्यायालयाने चिनचे उदाहरण दिले होते.
‘व्हर्जिन’ : 0.33 सेकंदांत 82.30 कोटी रिझल्ट्स
न्यायालयातील तर्कवितर्कांत गुगल इंडियाने एक मजेशीर उदाहरण दिले. गुगल सर्च इंजिनवर व्हर्जिन हा शब्द टाइप करा, सेकंदाच्या 33 व्या भागात तब्बल 82.30 कोटी रिझल्ट्स मिळतात. यात व्हर्जिन एअरलाइन्स, कुंवारपणाच्या क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन शोधांचीही माहिती यात असते. असे शब्द ब्लॉक केले तर जगभरातील कोट्यवधी इंटरनेट वापरकर्ते गरजेची माहिती मिळवू शकणार नाही.
आम्हीही वेबसाइट्स ‘ब्लॉक’ करु; गुगल, फेसबुकला दिल्ली हायकोर्टाचा इशारा
फेसबुक, गुगलवर खटला! सरकारने दिली परवानगी
अबब ! जगातील एक तृतीयांश घटस्फोटांमागे फेसबुक
फेसबुक वापरताय तर हे वाचा!