आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या डिझेलवर सरकारचा डल्ला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली /अहमदाबाद/ पतियाळा/संतोष ठाकूर,निमिष खाखरिया,दीपक मोदगिल - घाऊक ग्राहकांना बाजारभावाने डिझेल विकण्याच्या केंद्राच्या धोरणाचा राज्य सरकारांकडून फायदा लाटला जात आहे. जनतेसाठी पंपांवर उपलब्ध करण्यात आलेले डिझेल राज्यांकडून आपल्या परिवहन महामंडळाच्या बसेससाठी विकत घेतले जात आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकार, तेल कंपन्या वा पेट्रोल पंप चालकांकडे कोणतीही यंत्रणा नाही. पंपांवरील डिझेल हे घाऊक ग्राहकांसाठीच्या डिझेलपेक्षा 11 ते 12 रुपयांनी स्वस्त असल्यामुळे हा डल्ला मारला जात आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्‍ट्रासारख्या राज्यांकडून परिवहन महामंडळांच्या बसेससाठी पंपांवरूनच डिझेल भरले जात आहे.

हरियाणा, पंजाब, गोव्यासारख्या राज्यांच्या बससेवांनाही खासगी पंपांवरून डिझेल विकत घेण्यास सांगितले जात आहे. गुजरात रोडवेजचे सचिव पी.डी. पटेल यांच्यानुसार, खासगी पंपांवरून राज्यातील 8000 बसेससाठी रोज 6 लाख लिटर डिझेल खरेदी होत आहे. दुसरीकडे, पेप्सू रोड ट्रान्सपोर्ट कॉर्र्र्पोरेशनने घाऊक दरात डिझेल खरेदीचा करार रद्द केला आहे. उत्तर प्रदेश परिवहन मंडळाचे अधिकारी पी.एस. मिश्रा म्हणाले, मुख्यालयाच्या आदेशांनुसार पंपांवरून बसेसमध्ये डिझेल भरले जात आहे.