आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम हिंसाचारः बल्‍क एसएमएसवर गृहमंत्रालयाने घातली बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आसाम हिंसाचाराच्‍या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सोशल नेटवर्किंग साईट्सवर कडक निर्बंध घातले आहेत. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील भावना भड‍कविणा-या आणि आक्षेपार्ह पोस्‍ट न हटविल्‍यास साईट्सवर बंदी घालण्‍यात येईल, असा कडक इशारा केंद्र सरकारने दिला आहे. रात्री उशीरा गृह मंत्रालयाने हे निर्देश जारी केले.
आसाम हिंसाचार तसेच मुंबईतील दंगलींबाबत सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन मोठ्या प्रमाणात भावना भडकाविणा-या पोस्‍ट शेअर करण्‍यात आल्‍या होत्‍या. हिंसेचे लोण सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन पसरले. त्‍यामुळे यावर कडक नजर ठेवण्‍यात येणार आहे. अशा पोस्‍ट न हटविल्‍यास साईट्सवर बंदी घालू, असे स्‍पष्‍ट निर्देश गृहखात्‍याने दिले आहेत.
बल्‍क एसएमएस, एमएमएसवर बंदी
ईशान्‍येकडील नागरिकांच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने 15 दिवसांसाठी बल्‍क एसएमएस आणि एमएमएसवर बंदी घातली आहे. इशान्‍येकडील नागरिकांना धमक्‍या आणि द्वेषपूर्ण संदेश पाठविण्‍याचे प्रकार सुरु झाल्‍यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशा संदेशांमुळेच महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व इतर राज्‍यांमधुन नागरिकांनी पलायन सुरु केले आहे. त्‍यामुळे मुंबई, पुणे, बंगळुरुसह देशातील महत्त्वाच्‍या रेल्‍वे स्‍थानकांवर ईशान्‍येकडील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या नागरिकांमध्‍ये दहशतीचे वातावरण आहे. परंतु, त्‍यांना घाबरू नये, ते देशात कुठेही सुरक्षित आहेत. त्‍यांच्‍या सुरक्षेला प्राधान्‍य देण्‍यात येत आहे, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.
आसाम पुन्हा पेटले : बक्सा, कामरूप जिल्ह्यांत नव्याने हिंसाचार, 9 जखमी
आसाम हिंसाचार : विद्यार्थ्यांमध्ये भीती; चार हजार नागरिकांचे स्थलांतर
आसाम हिसांचार: अफवा पसरवणार्‍यांना अटक करा- गृहमंत्रालय