आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्‍य प्रमुख न्‍यायालयात गेल्‍यानंतर सरकार सावध, सर्वोच्‍च न्‍यायालयात कॅव्‍हेट दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः सैन्‍य प्रमुख जनरल व्‍ही. के. सिंग यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे दार ठोठावल्‍यानंतर केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहे. सरकारतर्फे आज कॅव्‍हेट दाखल करण्‍यात आली आहे. त्‍यात सरकारने न्‍यायालयाला संरक्षण मंत्रालयाची बाजू जाणून घेतल्‍याशिवाय कोणताही निर्णय न घेण्‍याची विनंती केली आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार जनरल सिंग यांनी न्‍यायालयाला सादर केलेली माहिती पुरेसी नसल्‍याचे सरकारने कॅव्‍हेटमधून म्‍हटले आहे. त्‍यामुळे न्‍यायालयाने सरकारच्‍या वतीने दिलेली माहितीही पडताळून बघावी, अशी विनंतीही सरकारने केली आहे.
या घडामोडीनंतर सरकारही सावध झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तडकाफडकी त्‍यांच्‍या नियोजित कार्यक्रमांमध्‍ये बदल केला. संरक्षण सचिव एस. के. शर्मा यांनाही परदेशातून तात्‍काळ भारतात परत बोलाविण्‍यात आले आहे. संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी आणि कायदेमंत्री सलमान खुर्शिद यांच्‍यासोबत पंतप्रधानांची बैठक होणार आहे. या घटनेचे राजकीय पडसाद जाणून घेण्‍यासाठी चर्चा करण्‍यात येईल. एंटोनी यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांच्‍यासोबत कालही चर्चा केली होती.
या घडामोडींनंतर जनरल सिंग यांच्‍यावर कारवाई करण्‍यात येणार नसल्‍याची माहिती आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने अद्याप सिंग यांची याचिका दाखल करुन घेतलेली नाही.
लष्करप्रमुख जनरल सिंग यांनी सरकारला खेचले सर्वोच्‍च न्‍यायालयात
लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या नोकरी की प्रतिष्ठेची लढाई ?
\'कोणत्याही आव्हानाला सोमोरे जाण्यास सेना सज्ज\'
पाक व्याप्त काश्मिरमध्ये चीनी फौजा - सेना दल प्रमुख सिंग