आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरल सिंग यांच्‍या उत्तराधिका-याची नियुक्ती लवकरच, सरकारची उत्तराची तयारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः सैन्‍य प्रमुख व्‍ही. के. सिंग यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतल्‍यानंतर पहिल्‍यांदाच केंद्र सरकारकडून प्रतिक्रीया आली आहे. संरक्षण राज्‍यमंत्री पल्‍लम राजू यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्‍याचे सांगून भारतीय सेना तसेच संरक्षण मंत्रालयासाठी हा चुकीचा पायंडा ठरु शकतो, असे मत व्‍यक्त केले.
या प्रकारावरुन सरकार आणि सैन्‍य प्रमुख आमने-सामने आले आहेत. सर्वोच्‍च न्‍यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु होण्‍यापुर्वीच सरकारकडून पुढील सैन्‍य प्रमुखाची नियुक्ती होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. जनरल सिंग यांचा उत्तराधिकारी नियुक्त करण्‍यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला काही अधिका-यांची एक यादी पाठविण्‍यात आली आहे. एवढेच नव्‍हे तर जनरल सिंग यांना दिर्घकालीन रजेवरही पाठविण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे. जनरल सिंग यांच्‍या याचिकेवर न्‍यायालयातच उत्तर देण्‍याची तयारी सरकारतर्फे करण्‍यात येत आहे. सरकारने सिंग यांच्‍या दाव्‍यांमधील दोष शोधून काढण्‍याची तयारी सुरु केली आहे. या मुद्यावरुन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिवसभर तज्‍ज्ञांसोबत चर्चा केली. या मुद्यावर सरकारसमोर असलेल्‍या सर्व पर्यायांवर विचार करण्‍यात आला.
सैन्‍य प्रमुख न्‍यायालयात गेल्‍यानंतर सरकारकडून कॅव्‍हेट दाखल