आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government May Lower The Age Criteria To Have Sex With Each Other Consent

\'सोळावे वरीस धोक्‍याचे\'- परस्‍पर सहमतीने शारिरीक संबंधासाठी वयोमर्यादा होणार कमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- परस्‍परसहमतीने शारिरीक संबंध ठेवण्‍यासाठी कायदेशीर वयोमर्यादा 16 वर्षांपर्यंत आणण्‍याचा प्रस्‍ताव लवकरच मंजूर होऊ शकतो. यासंदर्भात प्रस्‍ताव मंत्रिमंडळासमोर आला आहे. त्‍यात सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्‍यासाठी वय 18 ऐवजी 16 वर्षे करावे, असे त्‍यात सुचविण्‍यात आले आहे. फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013च्या मसुद्यात हा प्रस्‍ताव आहे.

या प्रस्‍तावात दुसरी महत्त्वाची बाब म्‍हणजे, लैंगिक छळासोबतच 'बलात्कार' हा शब्द या विधेयकात प्रथमच वापरण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूदही या विधेयकाच्‍या मसुद्यात आहे. विधेयकामधील अनेक कलमे न्‍या. वर्मा समितीच्‍या शिफारसींनुसार तयार करण्‍यात आली आहेत. त्‍यात 'वैवाहिक बलात्‍कार' या संदर्भाने कोणतीही तरतूद नाही.

मुलींचा पाठलाग करणे, ऍसिड हल्‍ला, अश्लिल हावभाव, अनुचित स्‍पर्ष इत्‍यादी गुन्‍ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद त्‍यात करण्‍यात आली आहे. शासकीय तसेच खासगी रुग्‍णालये, नर्सिंग होम इत्‍यादी ठिकाणी महिला पीडितांवर उपचार करणे बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्‍यास त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यात येईल. अशा प्रकरणांमध्‍ये केवळ महिला पोलिसाकडूनच पीडितेचे बयाण नोंदविण्‍यात येईल, अशीही तरतूद विधेयकामध्‍ये आहे.