आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Preparing To Act Against Persons Who Did Not File IT Returns Despite Having PAN

पॅनकार्ड असेल तर विवरणपत्र भरा, अन्‍यथा कारवाईला तोंड द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सरकारने कर चोरी करणा-यांवर कडक कारवाई करण्‍याची तयारी सुरु केली आहे. त्‍यानुसार पॅनकार्डधारक आता प्राप्‍तीकर खात्‍याच्‍या रडारवर आले आहेत. पॅनकार्ड असूनही प्राप्‍तीकर विवरण न भरणा-यांना नोटीस बचावण्‍यात येणार आहे. पॅनकार्ड घेऊनही अनेक वर्षांपासून विवरण न भरणा-या अनेकांना पत्रेही पाठविण्‍यात आली आहेत.

प्राप्‍तीकर विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार आतापर्यंत 35 हजार 170 लोकांना नोटीस पाठविण्‍यात आली आहे. इंटेलिजंस ऍंड क्रिमिनल इन्व्‍हेस्‍टीगेशन संचालनालयाकडे ही कारवाई सोपविण्‍यात आली आहे. नोटीस पाठविण्‍यात आलेल्‍यावर नजरही ठेवण्‍यात येणार आहे.

देशात सुमारे 12 लाख पॅनकार्डधारकांनी आपले विवरणपत्र सादर केलेले नाही. प्राथमिकता निश्चित करुन या लोकांना नोटीस पाठविण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर कडक कारवाई करण्‍यात येईल.