आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government To Use Forest Resources For Employment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जंगली वनस्पतींच्या दुर्मीळ गुणांचा वापर: लाखोंना रोजगार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योग आणि वाढते शहरीकरण पुरेसे पडत नाही, असे लक्षात आल्यानंतर आता सरकारची नजर जंगलांकडे वळली असून, जंगलातील साधनसंपत्तीचा वापर करून रोजगाराच्या नव्या संधींचा शोध घेण्याचे सरकारने ठरवले आहे. भारतीय वन संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. व्ही. के. बहुगुणा यांनी ही माहिती दिली आहे.
झारखंडच्या जंगलांतून लाखो लोकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली जाणार असल्याची घोषणाही बहुगुणा यांनी केली आहे. ते म्हणाले की वन संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ जंगलांचे व्यापक सर्वेक्षण करून अन्न व इतर मानवी गरजांसाठी उपयुक्त वनस्पतींचा शोध घेणार आहेत. या वनस्पतींचा उपयोग करण्याच्या पद्धतींची शक्यता पडताळून विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येतील.
शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झाल्यानंतर यातून रोजगार आणि व्यवसायासाठी लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. वन संशोधन परिषद विशिष्ट सात वनस्पतींची निवड करून त्या शेतात उगवण्यास योग्य बनवणार आहे. यातून लोकांना अन्न आणि रोजगाराचे पर्याय मिळतील.
ऋतूंशी थेट संबंध नाही : बहुगुणा यांनी सांगितले की, जंगल कमी किंवा जास्त होण्याशी उष्णतेचा थेट संबंध नाही. शंभर वर्षांपूर्वीही जेव्हा पृथ्वीचा बहुतांश भाग जंगलांनी व्यापलेला होता तेव्हाही उष्णता भरपूर होती.
रांचीमध्ये उष्णता वाढण्याचे कारणही जंगलांशी संबंधित नाही, तर पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर पातळ झाल्यामुळे असे होत आहे. अनेकदा स्थानिक पर्वत आणि भौगोलिक परिस्थितीही त्यासाठी जबाबदार असते.


जेनेटिक पायरसीविरूद्ध मोहीम
भारतातील वनस्पतींच्या दुर्मीळ गुणांची जेनेटिक पायरसी रोखण्यासाठी एक देशव्यापी मोहीम राबवण्याची घोषणाही बहुगुणा यांनी केली आहे. ते म्हणाले की, जेनेटिक पायरसी करणा-यांचे झारखंडकडे विशेष लक्ष आहे. येथील लुप्त होत चाललेल्या वनस्पतींच्या खास जनुकांचे पेटंट घेऊन ते आपले व्यापारी हेतू साध्य करू इच्छित आहेत. परिषदेची टीम लवकरच झारखंडमध्ये आढळणा-या वनस्पतींच्या विविध जातींचे सर्वेक्षण करून आवश्यक आकडेवारी गोळा करणार आहे.