आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Governmetn Ask To Take Views Of People Over Corruption

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारी सर्वेक्षण, सर्व खात्‍यांना सरकारचे पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भ्रष्टाचाराविरुद्ध सरकार करीत असलेल्या उपाययोजनांबाबत लोक संतुष्ट आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार सर्व खात्यांमार्फत एक सर्वेक्षण करणार आहे. सरकारने सर्व खात्यांना सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली तयार करण्यास सांगितले असून, त्याद्वारे भ्रष्टाचारविरोधी उपायांवर लोकांची मते जाणून घेता येणार आहेत.
प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार खात्याने या सर्वेक्षणाबाबत निर्देश जारी केले आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्राद्वारे मिळालेल्या या आदेशामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या पत्रात खात्याच्या सचिवांनी सरकारच्या वतीने म्हटले आहे की, भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांमुळे सामान्य नागरिकांना किती समाधान लाभले हे जाणून घेण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात यावा. त्यासाठी सर्व खात्यांनी एक सर्व्हे नमुना तयार करावा. विशेष सेवांसाठी यंत्रणा आणि निश्चित प्रक्रियांची एक यादी बनवावी, असेही आदेश खात्यांना देण्यात आले आहेत. तसेच या प्रक्रियांमध्ये कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे, कोणती सेवा लोकांना किती कालावधीत मिळाली आणि उशिराची कारणे वगैरे माहितीही देणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
या मार्गावरून वाटचाल
पत्रात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी लोकपाल विधेयक, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन बिल, ज्युडिशिअल अकाउंटेबिलिटी बिल संसदेपुढे विचाराधीन आहेत. निनावी ट्रान्झॅक्शन अ‍ॅक्टही अंतिम टप्प्यात आहे.
खोट्या दाव्यांचा मुकाबला
पब्लिक प्रोक्युअरमेंट विधेयकही विचाराधीन आहे. सरकारी वेबसाइटवर ‘काँटॅक्ट अस’ या रकान्यात महत्त्वाच्या लोकांचे फोन क्रमांक आणि ई-मेल पत्ते आहेत की नाहीत हे तपासण्याचा आदेशही सरकारने सर्व खात्यांना दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक मोहिमेतील दिशानिर्देशांचे पालन सक्तीने करण्यासही सांगितले आहे.