आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 आयआयटी स्‍थापन होणारः विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजूरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय तंत्रज्ञान संस्‍था अर्थात 'आयआयटी'ला स्‍वायत्तता देणारे तसेच अशाच प्रकारच्‍या आणखी 20 संस्‍था स्‍थापन करण्‍यास मंजूरी देणारे विधेयक आज मंत्रिमंडळाने मंजूर केले. प्रत्‍येक राज्‍यात एक आयआयटी स्‍थापन करावे, अशी योजना आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयआयटी विधेयक 2012 सध्‍या सुरु असलेल्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुर केलेले विधेयक संमत झाल्यावर आयआयआयटींना राष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने महत्त्वाच्‍या संस्‍थांचा दर्जा मिळेल.
एक आयआयआयटी स्थापन करण्याचा खर्च 128 कोटी रुपये येतो. त्‍यापैकी 50 टक्के वाटा केंद्राचा तर 35 टक्‍के वाटा राज्‍याचा आहे. उर्वरित 15 टक्‍के वाटा हा औद्योगिक भागीदारांकडून गोळा करण्‍यात येईल. आयआयटीच्‍या स्‍थापनेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना भागीदार होण्याची परवानगी या विधेयकात देण्यात आल्याची माहिती आहे.
सध्‍या ग्‍वाल्‍हेर, अलाहाबाद, जबलपूर आणि कांचीपूरम येथील आयआयटीसाठी केंद्राकडून निधी मिळतो.