आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Raises Cap On Supply Of Subsidised LPG Cylinders To 9

जोर का झटका धीरे सेः अनुदानित सिलिंडरची संख्‍या वाढविली, डिझेल महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने नव्‍या वर्षात दरवाढीचे धक्‍के दिल्‍यानंतर एक दिलासाही दिला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची संख्‍या दरवर्षी 6 वरुन 9 सिलिंडर्सपर्यंत वाढविली आहे. या गोड बातमीसोबतच एक धक्‍काही दिला आहे. डिझेलची दरवाढ करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजच दरवाढ होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे एका हाताने दिले तर दुस-या हाताने घेतले, अशीच स्थिती झाली आहे. दरम्‍यान, केंद्र सरकारने अनुदानित सिलिंडरची संख्‍या वाढविण्‍याच्‍या घेतलेल्‍या निर्णयावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतलेला नाही. त्‍यामुळे या निर्णयाला हिरवा कंदिल मिळाला आहे.

पेट्रोलियम मंत्री वीरप्‍पा मोईली यांनी आज कॅबिनेटच्‍या बैठकीत झालेल्‍या निर्णयाची माहिती दिली. अनुदानित सिलिंडर्सची संख्‍या वाढविल्‍यानंतर ग्राहकांना सप्‍टेंबर 2012 ते मार्च 2013 या कालावधीत 5 अनुदानित सिलिंडर्स मिळतील. त्‍यानंतरच्‍या आर्थिक वर्षामध्‍ये 9 सिलिंडर्स सवलतीच्‍या दरात मिळतील.