आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात नव्या 20 आयआयआयटींना मंत्रिमंडळाची मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात 20 नव्या आयआयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यास आणि त्यांना प्रशासकीय स्वायत्तता देण्यासंदर्भात मांडण्यात येणार्‍या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी हिरवा कंदील दर्शवला.
आयआयआयटी विधेयक 2012 सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संमत झाल्यास आयआयआयटीचा दर्जा सुधारणार आहे. एक आयआयआयटी स्थापन करण्यास 128 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी 50 टक्के खर्च केंद्र सरकार, तर 35 टक्के खर्च राज्य सरकार व उर्वरित 15 टक्के खर्च संबंधित व्यावसायिक भागीदाराकडून करण्यात येणार आहे. सार्वजनिक उपक्रमांनी यात भागीदार म्हणून सहभाग घ्यावा, असे केंद्राला अपेक्षित आहे. सध्या केंद्र सरकारच्या ग्वाल्हेर, अलाहाबाद, जबलपूर आणि कांचीपुरम अशा चार आयआयआयटी आहेत. या संस्थांना नुकताच अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक राज्यात एक आयआयआयटी स्थापन करण्याची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.