आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat, Film Director Prakash Chandani Detained At Ahmadabad Airport

आयपीएल-5 मधील सट्टेबाज, चित्रपट निर्माता चंदानी अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- आयपीएल-5 च्या सट्टेबाजीतील आरोपी आणि 'गली गली मे चोर' या चि‍त्रपटाचा सह-निर्माता प्रकाश चंदानी याला गुरुवारी अहमदबाद एअरपोर्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. आयपीएल-5 दरम्यान सट्टेबाजांच्या रॅकेटचा पोलिसांनी गेल्या मे महिन्यात भांडाफोड केला होता. पोलिसांच्या भीतीने चंदानी त्यानंतर दुबईला पसार झाला होता.
'गली गली में चोर है' या चित्रपटात सट्टेबाजीतील पैसा गुंतवला असल्याचाही चंदानीवर आरोप आहे. या च‍ित्रपटाचे प्रदर्शन ज्येष्ठ सामाजिक सेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पोलिसांच्या ताब्यात असलेला सट्टेबाज सोनू मलाड याच्या जबाबात सह-निर्माता प्रकाश चंदानी याचे नाव समोर आले होते.
17 मे रोजी पोलिसांनी दोन बुकींसह सहा सट्टेबाजों अटक केली होती. सोनू आणि बुकी आशिष हे चंदानीच्या संपर्कात होते, पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचीही चौकशी झाली होती.
नाना म्‍हणतो खेळांमध्‍ये सट्टेबाजी अधिकृत करा