आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Riots Case, Supreme Court Information To Temple For Gujarat

गुजरात दंगलीत जमिनदोस्त मंदिरांचा तपशील द्यावा- सुप्रीम कोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या दंगलीत जमिनदोस्त झालेली धार्मिक स्थळे, मंदिरांचा सरकारने तपशील सादर करण्‍याचे आदेश सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिले. तसेच दंगलीत नुकसानग्रस्त झालेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी ठराविक रक्कम ठरवून द्यावी, असे आदेशही न्यायाधिश के एस राधाकृष्‍णन् आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने दिले. गुजरात सरकारने हायकोर्टाच्या आदेशाला दिलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश दिले.
दंगलीदरम्यान जमिनदोस्त झालेली धार्मिक स्थळे आणि इमारतीच्या मालकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुजरात हायकोर्टाने दिले होते. परंतु हायकोर्टाच्या या आदेशाविरुद्ध गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होते.
धार्मिक स्थळांच्या डागडुजीसाठी सरकारी तिजोरीच्या पैशाचा वापर केला जाणार नाही, असे गुजरात सरकारने म्हटले होते. परंतु नदीला आलेल्या महापुरात वाहून गेलेली घरे अथवा भूकंपात पडलेल्या घरांना नुकसान भरपाई दिली जाते, मग धार्मिक स्थळांच्याबाबत असे का नाही? असा सवालही सुप्रीम कोर्टाने यावेळी उपस्थित केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.
दंगलींनंतर वाजपेयींनी कलाम यांना गुजरात दौ-यापासून रोखले होते
गुजरात दंगलः नरेंद्र मोदींना क्लिन चीट, एसआयटीला पुरावे आढळले नाही