आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Seeks Review Of Supreme Court Judgment On Lokayukta

लोकायुक्त निर्णयाबाबत गुजरात सरकारचे अपील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - लोकायुक्त प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे. राज्यपाल कमला बेनीवाल यांनी जस्टिस आर. ए. मेहता यांची लोकायुक्तपदावर केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवली होती.

मेहता यांची नियुक्ती राज्य सरकारला न विचारता करण्यात आली होती, असा आक्षेप घेत राज्य सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. परंतु न्यायालयाने राज्य सरकारचा दावा फेटाळून लावत राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला होता. त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली असून त्यात 11 जानेवारीच्या न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे.