आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री डिंपलने केली आत्महत्या

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- मॉडेल व उभरती गुजराती फिल्म अभिनेत्री डिंपल हिंगू (२५) हिने शुक्रवारी आत्महत्या केली. डिंपलने हिरे उद्योगावर आधारित असलेल्या रत्नकलाकार या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपलने गहावर मारायच्या औषधांच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
डिंपलने १५ गुजराती चित्रपट, ३० स्थानिक टीव्ही जाहिराती तसेच २० अल्बममध्ये काम केले आहे. फिल्म निर्माता कांतिलाल सावलिया यांनी सांगितले की, डिंपल शुक्रवारी सकाळी महेसाणामधून बेवफा पतंगिया नावाच्या अल्बममध्ये काम करुन आईच्या घरी परतली होती. संध्याकाळी चार वाजता ई-मेल करण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. त्यानंतर तिने औषधे खाल्ली असावीत, असे कांतीलाल यांनी सांगितले. त्यानंतर तिने कांतिलाल यांना बोलावून घेतले व मला वाघेश्वरी मंदिरात घेऊन चला अशी विनंती केली. तिकडे जात असतानाच तिला उलट्या होऊ लागल्या. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजले नाही.
अभिनेत्री रुबी सिंगची मुंबईत आत्महत्या
टीव्ही अभिनेत्री रुबिना शेरगिलचे निधन