आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरपालिका निवडणुकीत मोदींचा पुन्‍हा डंकाः 90 टक्‍के मुस्लिम शहरात क्‍लीन स्विप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या विरोधकांना चपराक देणारी एक बातमी आहे. गुजरातमध्‍ये मुस्लिमबहुल परिसरातील नगरपालिका निवडणुकींमध्‍ये भाजपने बहुमत प्राप्‍त केले आहे. राज्‍यात 75 नगरपालिकांसाठी मतदान झाले होते. त्‍यात 47 ठिकाणी भाजपला विजय मिळाला असून कॉंग्रेसला 8 ठिकाणी समाधान मानावे लागले आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे, 47 पैकी 6 नगरपालिकांमध्‍ये भाजपने संपूर्ण जागा पटकाविल्‍या आहेत.

जामनगर जिल्‍ह्यात सलाया येथे नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्व 27 जागांवर विजय मिळविला. या ठिकाणी 24 मुस्लिम आणि 3 हिंदू उमेदवार दिले होते. या भागात दशकभरापासून कॉंग्रेसचेच वर्चस्‍व होते. सुमारे 90 टक्‍के लोकसंख्‍या मुस्लिम आहे. त्‍यामुळे मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केल्‍याचे या निकालांवरुन स्‍पष्‍ट होते.