आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujrat Chiff Minister Narendra Midi Sapot To Mayavati

नरेंद्र मोदी यांचे मायावतींना फेसबुकच्या माध्यमातून समर्थन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद: उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि निवडणूक आयोग यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उडी घेतली आहे. सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'च्या माध्यमातून मोदी यांनी मायावतींना समर्थन जाहीर केले आहे.
26 जानेवारीला होणार्‍या पथ संचलनादरम्यान होणारी हत्तींची मिरवणुकीची परंपरा सरकार बंद करेल काय? हत्तीच्या या मिरवणुकीमुळे आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही काय? असे सवाल करत त्यांनी कॉंग्रेस आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशात मायावती आणि हत्तींच्या मूर्ती झाकण्याचे काम सुरू आहे. आयोगानुसार उत्तर प्रदेशातील हत्तीच्या मूर्ती पाहून मतदान कर्ता प्रभावित होऊन संबधित पक्षाला फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळे आचार संहितेचेही उल्लघंन होईल. यामुळे लखनऊसह नोयडा येथील सर्व हत्तीच्या मूर्ती झाकण्यात आल्या आहेत. यावर मायावती यांनी आपल्या जन्‍मदिनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते.
स्‍वामी विवेकानंद यांच्‍यासोबत नरेंद्र मोदींची तुलना