आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या उपवास स्थळाजवळ गोधळ घालणार्‍या मुस्लिम कार्यकर्त्यांना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोधरा: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सद्‍भावना मिशनअंतर्गत शुक्रवारी गोधरा येथे एक दिवसीय उपवास करीत आहे. मोदींच्या व्यासपीठावर मुस्लिमांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असताना उपवास स्थळाजवळ काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. गोधरा येथे झालेल्या हत्याकांडामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. मोदींच्या उपवास स्थळाजवळ शबनम हाशमी यांनी काही कार्यकर्त्यांसह समांत्तर उपवास करण्‍याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले आहे.
मोदी यांनी सद्‍भावना मिशनअंतर्गत मुस्लिम समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनीती आखली आहे, अशी टीका विरोधक करीत आहेत. मोदींच्या उपवास कार्यक्रमादरम्यान शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी उपवास स्थळावर जुम्मा आणि नमाजची स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे.
मोदी यांनी 2011 मधील सप्टेंबर महिन्यात शांती, एकता आणि सद्‍भावनेसाठी अहमदाबाद येथे तीन दिवसीय सद्‍भावना मिशन उपवास केला होता. सद्‍भावना मिशनअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक-एक दिवसाचा उपवास करण्याचे मोदी यांनी याप्रसंगी जाहीर केले होते. .
पंचमहाल जिल्ह्यातील गोधरा हत्याकांडावरून चर्चेत आलेल्या या शहरात मोदी उपवास करणार की नाहीत, यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. परंतु, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालय सूत्रांनी मोदी 20 जानेवारीला गोधरा येथे उपवास करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
नरेंद्र मोदी यांचे 'सद्‍भावना मिशन' हा एक केवळ राजकीय स्टंट असल्याचे गोधरा हत्याकांडाच्या प्रमुख सूत्रधाराच्या आरोपातून मुक्त झालेले मौलाना उमरजी यांचा मुलगा सईद उमरजी यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांचे मायावतींना फेसबुकच्या माध्यमातून समर्थन
स्टार प्रचारक म्हणून भाजपच्या यादीत वाजपेयी, मोदी, वरुण गांधी
सोशल मीडियावर नरेंद्र मोदी लोकप्रिय नेते