आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुवाहाटीतील पिडीत मुलीला दिले होते सिगारेटचे चटके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी येथे अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करणारे 7 आरोपी अद्याप मोकाट आहेत. मुख्‍यमंत्री तरुण गोगोई यांनी दिलेली 48 तासांची डेडलाईनदेखील संपत आलेली आहे. या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. पिडीत मुलीला या आरोपींनी मारहाण करुन कपडे फाडण्‍याचा प्रयत्‍न तर केलाच. परंतु, त्‍यांनी सिगारेटचे चटकेही दिल्‍याचे तिने महिला आयोगाला सांगितले.

छेडखानीमागे पत्रकार आणि कॉंग्रेस नेत्‍याचा हातः अखिल गोगोई
गुवाहाटीत भर रस्त्यावर तरुणीची एका टोळक्याने अर्धा तास छेड काढल्याच्या घटनेने देशभर खळबळ उडवून दिली असली तरी हा प्रकार पूर्वनियोजित होता, असा दावा माहिती-अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी केला आहे. ‘न्यूज लाइव्ह’ वाहिनीचा पत्रकार आणि काँग्रेसचा यात हात असल्याचा आरोप त्यांनी केला. याचे पुरावे म्हणून घटनेचा मूळ व्हिडिओ त्यांनी जारी केला.
अखिल गोगोई टीम अण्णासोबत काम करतात. हा प्रकारच पूर्वनियोजित असल्याचा दावा करून त्यांनी मूळ व्हिडिओ जारी केला.‘न्यूज लाइव्ह’ची मालकी काँग्रेसचे मंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्याकडे आहे. त्यामुळेच पोलिसांनी लवकर कारवाई केली नाही, असा गोगोईंचा दावा आहे. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये शूटिंग करणारा पत्रकार स्वत:च याची कबुली देत असल्याचे दिसते. ‘न्यूज लाइव्ह’चे संपादक सय्यद जरीर हुसेन यांनी मात्र हा आरोप फेटाळला. शूटिंग करण्यापेक्षा संबंधित पत्रकार आणि कॅमेरामनने पोलिसांना माहिती का दिली नाही, असा प्रश्न गोगोई यांनी केला.
गुवाहाटीतील अत्‍याचारप्रकरणी पत्रकार, कॉंग्रेस नेत्‍यावर आरोप
गुवाहाटीत अल्पवयीन मुलीला मारहाण करून केले बेअब्रू!
टवाळखोरीमुळे उस्मानाबादेतील मुली असुरक्षित.!