आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता छत्तीसगढमध्ये लाजिरवाणा प्रकार, प्रेमी युगलाला विवस्त्र करुन बनवला MMS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रतनपूर/गुवाहाटी - गुवाहाटी येथे घडलेल्या लाजिरवाण्या प्रकारानंतर आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना विशेष यश आलेले नाही. दरम्यान, छत्तीसगढमध्येही असाच घृणास्पद प्रकार घडला आहे. बिलासपूरमधील रतनपूर जवळील खूंटाघाट येथे फिरायला आलेल्या एका प्रेमी युगलाला चार शस्त्रधारी युवकांनी पकडले. त्यांनी या दोघांनाही विवस्त्र करुन त्यांचा MMS बनवला. आता हा MMS शेकडो लोकांच्या मोबाईलपर्यंत पोहचला आहे.
पाच मिनीटांच्या या क्लिपमध्ये १५-१६ वर्षांची एक मुलगी आणि चार ते पाच मुले दिसत आहेत. माणूसपणाला कलंक असलेले हे तरुण त्या मुलीला कपडे काढाण्यासाठी दबाव टाकतात. ती अल्पवयिन मुलगी त्यांचे हात-पाय धरते, ढसाढसा रडत त्यांना सोडून देण्याची विनंती करते. मात्र, त्यांना तिची दया येत नाही. जवळपास १५ दिवसांपूर्वीची ही घटना आहे. हा MMS वेगाने पसरत असून पोलिस अजूनही औपचारिक तक्रारीची वाट पाहात आहेत.
छेडछाडीचा बळी : उस्मानाबादेत पेटवून घेतलेल्या मुलीचा मृत्यू
छेड छावण्या रोखण्याबाबत पोलिस उदासीन..
PHOTOS - रणरागिणी : छेड काढणार्‍यास तरुणीने चपलेने चोपले
मुलींची छेड रोखण्यासाठी हेल्पलाइन : सुप्रिया सुळे
महिलांची छेडछाड: निर्लज्ज मोर्चामुळे समाजाची मानसिकता बदलू शकेल काय?