आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gwalher's Vintage Car Musum Conserv The Development Of Cycle

ग्वाल्हेरचे व्हिंटेज गाड्यांच्या संग्रहातून विकासचक्रांची जपवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीस फूट लांब वाफेचे इंजिन - Divya Marathi
तीस फूट लांब वाफेचे इंजिन

ग्वाल्हेर - कोणे एकेकाळी श्रीमंतांच्या अंगणाची शान वाढवणा-या व्हिंटेज कार आणि दुचाकी यांच्या आकर्षणातून त्यांचा संग्रह करणारे अनेक लोक आपण पाहतो. अशा व्हिंटेज गाड्यांचे प्रदर्शन तसेच स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो. या वाहनांच्या माध्यमातून जुना काळ जागवल्याचे समाधान या संग्राहकांना मिळते. मात्र ग्वाल्हेर शहराने अशाच व्हिंटेज गाड्यांच्या संग्रहातून विकासचक्रे जपली आहेत.
शहरात सर्र्वप्रथम दाखल झालेला ट्रॅक्टर असो, वाफेवर धावणारे रेल्वे इंजिन असो किंवा डोड जी कंपनीची मल्टिपर्पज व्हॅन. शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारी ही वाहने आजही शहराने जपली आहेत. यांत्रिक शेती किंवा रुळांवर धावणा-या रेल्वेबाबत लोकांना माहिती नव्हती, त्या काळात ही वाहने येथे दाखल झाली. त्यांनी शहराच्या विकासाला वेग आणि नवी दिशाही दिली. मल्टिपर्पज व्हॅनचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने अशा फक्त दोन व्हॅन तयार केल्या. एक-इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राजघराण्यात, तर दुसरी ग्वाल्हेर येथे आहे.

या संग्रहालयातील काही मोजक्य वस्तु पाहा ............