आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्रांतीसाठी घेतलेल्या सुटीत झाला इथिकल हॅकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - एका अपघातानंतर मंज्योतला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु बळजबरीच्या विश्रांतीमुळे आयुष्याला नवीन वळण मिळेल, याची साधी कल्पनाही मंज्योतने केली नसावी. घरात बसल्याबसल्या नेटवरून हॅकिंगची माहिती गोळा केली आणि तो लवकरच इथिकल हॅकर होऊन हॅकिंगवर पुस्तकही लिहीत आहे.
हॅकिंगवरील पुस्तक लिहिण्यासाठी त्याला हैदराबादमध्ये राहणारा त्याचा मित्र रिशाल मदत करत आहे. मंज्योत आणि रिशाल यांची मैत्रीही इंटरनेटवरच झाली आहे. दोघेही रात्री व्हायरस शोधायचे काम करायला सुरुवात करतात ते थेट पहाटे पाच वाजेपर्यंत. मंज्योत आणि रिशाल यांनी आतापर्यंत अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, इबे, फेसबुकवर बग डिटेक्ट केले आहे. पीएयूच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये बारावीत शिकणाºया मंज्योतला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपघात झाला होता.

हॅकर्सने बनवलेली साइट कशी समजू शकेल

एखादी साइट किंवा प्रोग्रामला अपलोड करण्यापूर्वी त्या साइटची मूळ साइज जाणून घ्या. जर त्या प्रोग्रामची साइज मूळ साइजपेक्षा कमी असेल तर ती साइट हॅकर्सची आहे, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ पिकासाचा मूळ आकार 10.68 मेगाबाइट आहे, तर हॅकर्सने तयार केलेल्या साइटचा आकार 2.7 मेगाबाइट असेल. त्याशिवाय ब्लॅक हॅट हॅकर्सने तयार केलेल्या साइटचा आकार आणि आयकॉनदेखील अंधुक दिसू लागेल.

सरकारी डाटा सुरक्षित नाही
सरकारचा डाटा सुरक्षित नसल्याचा दावा हैदराबादमधील रिशालने केला आहे. सरकारी विभाग आपला डाटा अपडेट करत नाही. सुरक्षित हॅकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या तरुणांसाठी देशात एकही संस्था नाही. पदवी किंवा पदविकेसाठी प्रतिष्ठित संस्था उपलब्ध नाही. देशात अशी सुविधा असेल तर खासगी किंवा सरकारी क्षेत्रातील तंत्रज्ञानात इतर विकसित देशांच्या तुलनेत सन्मानजनक स्थिती असेल. देशाला तसे उभे करता येऊ शकेल, असे रिशालने सांगितले.