आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हमीद अन्सारी विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रालोआचे उमेदवार जसवंत सिंह यांना पराभूत करत डॉ. हमीद अन्सारी दुसर्‍यांना उपराष्ट्रपतिपदी निवडून आले आहेत. डॉ. अन्सारी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती असतील.
मंगळवारी झालेल्या मतदानात अन्सारी यांना 490 मते मिळाली, तर रालोआचे जसवंत सिंह यांना 238 मते मिळाली. निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील 740 खासदारांनी मतदान केले. दुसर्‍यांदा उपराष्ट्रपती होणारे डॉ. अन्सारी दुसरे व्यक्ती आहेत. बिजद, तेलगू देसम आणि आरएसपीने निवडणुकीत सहभागी न होण्याची घोषणा आधीच केली होती.
राधाकृष्णननंतर अन्सारी दुसरे
दोन वेळा सलग उपराष्ट्रपतिपदासाठी निवड झालेले हमीद अन्सारी दुसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत. या आधी 1952 ते 62 या काळात राधाकृष्णन यांनी सलग दोन वेळा उपराष्ट्रपतिपद भूषवले होते.
उपराष्ट्रपती निवडणूक: जसवंतसिंग विरुद्ध हमीद अन्सारी लढत
युपीएची लंच डिप्लोमसी: सोनियांसोबत मायावती तर, पीएमसोबत मुलायम