आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर हेडलीला फाशीच द्या ;भारत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याला अमेरिकी कोर्टाने 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली असली तरी त्याला फाशीच व्हायला हवी, अशी भूमिका भारताने घेतली आहे. 165 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अतिरेक्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न भारताने थांबवलेले नाहीत. हेडलीने अमेरिकेशी केलेल्या करारातील शर्तींचे उल्लंघन केले तरच त्याचे प्रत्यार्पण होऊ शकेल, असे अ‍ॅटर्नी गॅरी एस. शॉपिरो यांनी म्हटले आहे.
परराष्‍ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपनेही नाराजी व्यक्त करत हेडलीला ताब्यात देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनीही हीच भूमिका शुक्रवारी मांडली.
निकाल योग्यच; अमेरिकेने केला बचाव
कोर्टाने दिलेल्या निकालाचे अमेरिकेने समर्थन केले. हेडलीने या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य केल्याने त्याला सरकारी पक्षाने फाशी मागितली नाही. शिवाय या अटीवरच खटला चालला. भारतीय तपास संस्थांनाही त्याने अतिरेकी कारवायांची इत्थंभूत माहिती पुरवली असल्याचे अमेरिकी वकिलातीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
अमेरिका-हेडलीत झालेला करार
सुनावणीपूर्वी हेडली आणि अमेरिकी सरकारमध्ये एक करार झाला होता. त्यात हेडलीने हमी दिली होती की...
*अतिरेकी हल्ल्याच्या तपासात पूर्ण मदत.
*भविष्यात यासंबंधीच्या चौकशीत परदेशी सरकारांनाही मदत करील.
*तपासात सर्व सत्य माहिती देण्याची हमी.
मोबदल्यात अमेरिकेने दिलेली हमी
*अमेरिकी कोर्ट हेडलीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणार नाही. ०हेडलीस भारत, पाक किंवा डेन्मार्ककडे सोपवले जाणार नाही.
हा तर अपमान : अमेरिकेतील किया शीर यांनी हा
निकाल मृत्युमुखी पडलेल्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मुंबई हल्ल्यात शीर यांचे पती अ‍ॅलन आणि 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता.