आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hanging Process Of Afzal Regarding Constitution Home Minister Shinde

अफझलच्या फाशीची प्रक्रिया घटनेनुसारच - गृहमंत्री शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसद हल्ल्यातील कुख्यात अतिरेकी अफझल गुरू याच्या फाशीची प्रक्रिया ही घटनात्मक तरतुदींनुसारच अमलात आणली आहे. त्यात कुठलाही भेदभाव किंवा राजकारण करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. अफझल गुरूच्या कुटुंबीयांना तिहार जेलमधील त्याच्या कबरीपर्यंत जाऊन अंत्यविधीची धार्मिक प्रक्रिया करण्याच्या परवानगीबाबत विचार केला जाऊ शकतो, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

अफझलला फाशी देण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना सरकारने 7 फेब्रुवारी रोजी स्पीड पोस्टने कळवले होते. ते पत्र त्यांना दोन दिवस उशिरा मिळाले. गृहमंत्रालयाने केलेल्या स्पीड पोस्ट व तारेचे पुरावे शिंदेंनी पत्रकार परिषदेत सादर केले. दरम्यान, अफझल गुरूने मृत्यूपूर्वी पत्नी तबस्सुमला उर्दूत पत्र लिहिले होते. ते त्याच्या कुटुंबीयांना पोस्टाने पाठवण्यात आल्याची माहिती तिहार जेलच्या अधिका-यांनी दिली.