आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hanging To Terorist Afjal Guru At Tihar Jain Delhi

दहशतीचा गुरूर संपला; देशाच्या दुसर्‍या शत्रूचे तिहारमध्ये दफन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 80 दिवसांपूर्वी ज्याप्रमाणे कसाबला फाशी देण्यात आले, अगदी त्याचप्रमाणे अफझल गुरूला अखेर फासावर लटकवण्यात आले आहे. संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफझलला शनिवारी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी फाशी देण्यात आली आणि साडेआठ वाजेच्या सुमारास तिहारच्या तुरुंग क्रमांक तीनजवळ दफन करून टाकण्यात आले.

केंद्रीय गृहसचिव आर.के. सिंह यांनी सर्वात आधी फाशी देण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच काश्मीरच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली. अफझलच्या कुटुंबीयांनी शव देण्याची मागणी केली आहे. परंतु सरकारने परिस्थिती चिघळू नये म्हणून शव न देण्याचा निर्णय घेतला. आपणाला फाशीची माहितीच देण्यात आली नाही, असा आरोप अफझलच्या पत्नीने केला आहे. मात्र आर.के.सिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. स्पीड पोस्ट आणि साध्या टपालाने त्याच्या परिवाराला कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

2008 मध्ये म्हटले होते : असे तीळ तीळ मरण्यापेक्षा मृत्यू द्या, पण हे सरकार फाशीही देत नाही - अफझलने 2008 मध्ये एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने म्हटले होते की, त्याला असे तीळ तीळ मरण्याची इच्छा नाही. परंतु यूपीए सरकार त्याला फाशी देणार नाही. त्यामुळे भाजपचे सरकार यावे व अडवाणी पंतप्रधान व्हावेत अशी त्याची इच्छा आहे. आपल्या फाशीवर निर्णय घेऊ शकतील असे तेच एकमेव व्यक्ती आहेत, असे त्याचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती.

मवाळ प्रतिमा पुसण्यात सरकार यशस्वी होईल
* ज्याप्रमाणे सर्व शंका-कुशंका आणि धमक्यांकडे दुर्लक्ष करून हा निर्णय घेतला गेला, त्यामुळे मवाळ भूमिकेचा समज पुसून टाकता येईल.
* जी. पार्थसारथी यांच्या शब्दांत : कसाब आणि अफझलद्वारे हा संदेश पोहोचेल की आम्ही आता कठोर निर्णय घेऊ शकतो.
* भगव्या दहशतवादाच्या आरोपामुळे अडचणीत आलेले सरकार आता हरतºहेच्या दहशतवादाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतो, असा दावा करू शकेल.
* हिंदू संघटनांकडून मालेगाव, समझौतासारख्या घटनांच्या निमित्ताने कोंडी होण्याच्या धोक्यापासून सरकार निश्चिंत राहील. आम्ही कोणताही भेदभाव न करता दहशतवादाशी दोन हात करतो, असा युक्तिवाद करेल.