आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौटाला पिता-पुत्राचे तुरुंगात नखरे सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांच्या मुलास विविध सुविधा हव्या आहेत. आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे, असे चौटाला यांनी म्हटले आहे तर त्यांचा मुलगा अजय याने गळ्यात सोन्याची चैन घालण्याची आणि घरचे जेवण घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे.

दिल्ली येथील विशेष सीबीआय न्यायालयात यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. शैक्षणिक घोटाळ्याचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांच्या वकिलांकडून हा अर्ज दाखल करण्यात आला होता. चौटाला अनेक आजार आणि व्याधींनी त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती त्यांच्या मार्फत करण्यात आली होती. न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत त्यावरील निकाल राखीव ठेवला आहे. त्याचबरोबर पिता-पुत्रांना घरच्या जेवणाचीही आता आठवण आली आहे. घरचे जेवण घेण्याची परवानगी मिळावी. घरचे कपडे, गळ्यात सोन्याची चैन घालता यावी, घरातील सदस्यांची भेट घेता यावी, अशी विनंती त्यांनी अर्जाद्वारे केली आहे. तुरूंग प्रशासनाने नियमानुसार त्यावर कारवाई करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. 21 जानेवारी रोजी खटल्यातील 19 दोषींची बाजू ऐकून घेणार आहे. 22 पर्यंत त्यावरी निकाल राखून ठेवण्यात आला आहे.